परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आँक्सिजन प्लँटवरच मंगळवारी रात्री एक झाड कोसळल्याने प्लँट मधील आँक्सिजनची मोठ्याप्रमाणात गळती सूरू झाली परंतू तज्ञांसह सरकारी यंत्रणेसह अग्निशमन दलाने युध्द पातळीवर प्रयत्न करीत मध्यरात्री वायू गळती थांबली.
शिवसेनेचे खासदार संजय जाधव ,जिल्हाधिकारी दीपक मूगळीकर जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनी तातडीने हालचाली करीत आँक्सिजन वरील चौदा रुग्णांना अन्यत्र हलविले होते. त्यापाठोपाठ जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर, उपविभागीय अधिकारी डाँ संजय कुडेटकर यांच्यासह यांनी तज्ञांना पाचारण केले.
शहरातील Bio medical Engineer सुनील कुलकर्णी यांना तातडीने बोलवण्यात आले, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अत्यंत काळजी पुर्वक गळती बंद करून अपघात विभाग सोडून अन्य विभागाचा पुरवठा सुरू करुन दिला. यावेळी आधिकारी, कर्मचारी यांनी ठाण मांडून स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत मदतीचं काम केले.