राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस आलेले पाहायला मिळत आहे.
भाजपचा विजय रथ प्रगतीपथावर असताना राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली होती. मात्र, आता पुन्हा राष्ट्रवादीला चांगले दिवस येत आहेत.
राष्ट्रवादीत आता रोजच इनकमिंग सुरु आहे. यामध्ये आता सोलापूरमधील एमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांची राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे सोलापूर राष्ट्रवादीमध्ये आता नेत्यांची भर पडणार आहे.
एमआयएम नेते तौफिक शेख राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन सहा नगरसेवकांसह सोलापुरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने सोलापूरमध्ये राष्ट्रवादी पक्ष बळकट होणार आहे. शेख हे मोठे नेते मानले जातात, त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.