जागतिक कोरोना महामारीचे संकट राज्याला दिवसेंदिवस भेडसावत आहे. रेमडिसिवीर, ऑक्सीजन आणि लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्राकडून ४० हजार रेमडिसिवीर वायल्स मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील
रेमडिसिवीर तुटवडा काही प्रमाणात भरून निघेल.
केंद्र सरकारने देशभरासाठी रेमडिसिवीर वाटपाचा आदेश काढला होता. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला कमी इंजेक्शन्स आली होती. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली असून दिवसाला ४० हजार वायल्स मिळणार आहेत. यामुळे काही प्रमाणात राज्यातील रेमडिसिवीरचा तुटवडा भरून निघेल.
तरीही आणखी १० हजार वायल्स रोज मिळाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्र सरकारला करणार आहेत. सध्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आम्ही समाधानी असून त्यांचे आभार व्यक्त करतो, अशी सकारात्मक भूमिका राष्ट्रावादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली.