सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणांत एनसीबीची कारवाई

12

सुशांतसिंह राजपूत याचे मृत्यू प्रकरण चांगलेच तापले होते. यावरुन राजकीय वातावरणसुद्धा तापले होते. मुंबई पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करीत अनेकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यादरम्यानच या प्रकरणाचे ड्रग्स कनेक्शनसुद्धा समोर आले होते. आणि त्यानंतर एनसीबीने आपल्या कारवाईची सुरुवात करत अटकसत्रदेखील सुरु केले होते. अलिकडे हे प्रकरण काहीसे शांत झाले होते. अशांतच एनसीबीने पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. सुशांतचा मित्र आणि सहाय्यक दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ऋषिकेश सुशांतला ड्रग्ज पुरवत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. यासंबंद्धी एनसीबीनं त्याला चौकशीसाठी समन्सदेखील बजावले होते. पण अनेकदा नोटिस पाठवल्यानंतरही ऋषिकेशकडून ऊत्तर मिळालं नाही. त्यामुळं एनसीबीची टीम ऋषिकेश पवार याच्या चेंबूरच्या घरी गेली होती तेव्हा तो घरी नव्हता आणि त्यानंतर त्याला फरार म्हणून घोषित करण्यात आले होतं. अखेर आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, ‘एनसीबी’नं सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा शांत झालेल्या तपासाने अता पुन्हा नव्याने वेग घेतला असल्याचे बोलले जात आहे.
सुशांतचा अंमली पदार्थांशी नेमका संबंध कसा होता, या माहितीसाठी ऋषिकेशची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.