सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील अनेक ड्रग्स कनेक्शन उघडकीस आले. बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शन केसचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आज अभिनेता अर्जुन राजपाल यांच्या मुंबईतील घरी छापा मारण्यात आला. अर्जुन रामपाल यांच्या वाहन चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी एनसीबीने आपलं धाड सत्र सुरुचं ठेवल आहे. NCBची टीम ड्रग्स प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत यामध्ये आणखी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली आहे.
आज सकाळी अर्जुन रामपाल यांच्या अंधेरी आणि वांद्रे येथील घरावर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. अर्जुनच्या घराची झडती सुरू आहे. याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमोट्रियड्सचा भाऊ अगिसियालोस या अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी त्याला जामीन दिला होता परंतु आता पुन्हा त्याला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. अगिसियालोस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. अगिसियालोस हा एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्स तस्कराच्या संपर्कात होता. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात दिपीका पादुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांसह अनेक दिगग्ज कलाकार यामध्ये अडकले होते. यादरम्यान अनेकांची चौकशी देखील करण्यात आली. मुंबईतील ड्रग्स कनेक्शन हळूहळू समोर येत असून आणखी कोणाची नावे समोर येतील हे काही दिवसांमध्ये कळेल. दरम्यान मागील दोन-तीन दिवसात NCBने मुंबईत 5 ठिकाणी धाड टाकली.