अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण भारतभरातून संशयास्पद आत्महत्या असल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. यादरम्यान सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले आणि त्यानंतर सुशांतचे ड्रग्ज प्रकरण एनसीबीकडे गेले. आज एनसीबी न्यायालयासमोर ३० हजार पानांच आरोपपत्र दाखल करणार आहेत. अशी माहिती एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली असून ते स्वत: हे आरोपपत्र न्यायालयासमोर सादर करणार आहेत. यामध्ये कुठली नावे समोर येतात यावरुन बॉलीवुडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज घेत होता हे ऊघड झाल्यानंतर एनसीबीने आपल्या तपासात वेग घेतला होता. तपासादरम्यान एनसीबीने अनेकांची चौकशी केली ज्यामध्ये काही बॉलीवुड स्टारचासुद्धा समावेश होता. सुशांतची गर्लफ्रेंड्ण रिया चक्रवर्ती त्याला ड्रग्ज देत असल्याचा संशय होता. परिणामी रियाला एक महिना कारावाससुद्धा भोगावा लागला होता. आता मात्र एनसीबी आरोपपत्र न्यायालयासमोर सादर करणार आहे.
या आरोपपत्रामध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ आणि अन्य ३३ जणांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभिनेत्री रिया चक्रावर्ती हीच्या अडचणीत आता अाणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही ड्रग्ज पेडलर्सचीसुद्धा नावे असल्याचं कळते आहे.
१४ जुन २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील सुशांतच्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले होते. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर प्रचंड वादविवादसुद्धा झाले. यादरम्यान सुशांतचे ड्रग्ज प्रकरण समोर आले आणि एनसीबीने प्रकरण हाती घेतले. अनेकठिकाणी छापेमारी करण्यात आली, चौकशी करण्यात आली. आता एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे.