NCL Recruitment 2020- एक मुलाखत आणि थेट ऑफिसर, सॅलरी 1 लाखांपेक्षा जास्त

2

राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरीमध्ये सिनिअर टेक्निकल ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर, फायर सेफ्टी ऑफिसर आणि इतर अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदवीधर आणि 10वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी  नोकरीची ही संधी आहे. एकूण 45 रिक्त पदांवर भरती होईल. ज्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा सुरवातीला उत्तीर्ण व्हावे लागेल. परंतु सिनिअर पदांवर भरती थेट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होईल. अर्ज करण्याची पद्धत आणि निवडप्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वपूर्ण माहिती ncl-india-org यावर जारी करण्यात आली आहे. उमेदवारांनी माहिती नोटिफिकेशनमध्ये चेक करावी त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरावा.

जारी पदांची माहिती:
टेक्निशियन 20
टेक्निशियन असिस्टंट 10
टेक्निकल ऑफिसर 12
सीनिअर टेक्निकल ऑफिसर 02
फायर सेफ्टी ऑफिसर 01
एकूण पदे- 45

आवश्यक पात्रता:
ऑफिसर पदावर अर्ज करताना उमेदवाराकडे या संबंधित ट्रेडमध्ये B.E./B.Techची पदवी, तसेच याबाबत अनुभव असणेही गरजेचे आहे. तसेच टेक्निशियन पदांवर सायन्स स्ट्रीममधून 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. पदानुसार उमेदवारांच्या वयाची पात्रता हि वेगवेगळी आहे. उमेदवारांनी याबाबत सर्व माहिती नोटिफिकेशनमध्ये पहावी.

अर्ज शुल्क:
UR/ EWS/ OBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 100 रुपये आहे. तर इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. 2 नोव्हेंम्बरपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तर याची अखेर तारिख 2 डिसेंम्बर आहे. तसेच अर्जाची हार्ड कॉपी 31 डिसेंम्बरपर्यंत देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवावी लागेल.

फॉर्म पाठवण्यासाठीचा पत्ता:
प्रशासकीय अधिकारी
CSIR- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा
डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे- 411008(महाराष्ट्र)