राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचा आरोप

171

नातेवाईक असलेल्या तरुणीने ओशिवारी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. पीडितेने 10 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरू होते.पुढे बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध धनंजय मुंडे यांनी शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्हिडिओ काढून आपल्या धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे

एवढेच नाही तर तरुणीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी साद घातली आहे.