‘राष्ट्रीय अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

17

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या विश्वभुवन ऑडिटोरिअम येथे राष्ट्रवादी काँग्रेस इंजिनिअर सेलच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील, माननीय आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस इंजिनिअर सेलचे अध्यक्ष अमित देसाई, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे व पुण्याच्या सनबिम ग्रुपचे चेअरमन सारंग पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.