राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेऊ नये; ‘या’ शिवसेना नेत्याचं मत

81

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंडेंवरील आरोपांची आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे. गेल्या काही वेळात या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. ही सगळी परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेऊ नये, असे माझे मत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर ज्या महिलने आरोप केले आहेत, तिच्यावरच इतर व्यक्तींकडून गंभीर आरोप करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. हे धक्कादायक आहे. अशा प्रवृत्तीला उत्तेजन मिळू नये म्हणून याप्रकरणाची आणखी खोलात जाऊन चौकशी गरज असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.