राष्ट्रवादी महापालिका निवडणूक लढवणार स्वबळावर

4

राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. एक वर्षापूर्वी तिन्ही भिन्न विचाराच्या पक्षांनी भाजपाला डावलून सरकार स्थापन केले होते. त्यांनतर सुरू असलेल्या पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुका ही तीन पक्ष मिळवून लढत आहे

त्याचबरोबर पुढच्या वर्षी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक तिन्ही पक्ष सोबत लढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतू राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खळबळ जनक वक्तव्य केले आहे . ते म्हणाले की जानेवारी मध्ये होणारी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार आहे.

आत्ता हे बघावे लागणार आहे की काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारची होत असलेली विसंगती या वक्तव्याने यात काही फरक पडेल का?