…’या’साठी राष्ट्रवादी अण्णा हजारेंना पाठिंबा देणार

123

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीत उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. मात्र, हजारे आंदोलन करण्यावर ठाम आहेत. यातून केंद्र सरकार आणि भाजपपुढील अडचणी वाढल्याचे दिसून येते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाच्या वेळी पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंबंधी मोठे विधान केले आहे. अण्णा हजारे यांच्यासह शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलने करत आहेत, त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील तीन केंद्रीय विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अण्णा हजारे शेतकऱ्यांसाठी उपोषण करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला आमचा पाठिंबा असेल. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे चर्चा न करता केलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे.

अण्णा हजारेही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन उपोषण करणार आहेत, त्यामुळे अण्णा हजारे यांना आमचे समर्थन आहे. शेतकर्‍यांसाठी लढणारांना आमचा पाठिंबा असेल, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.