राष्ट्रवादीच्या महिला नेत्या म्हणतात धनंजय मुंडे प्रकरणात अनेक ट्विस्ट, त्यामुळे काहीही समजेनासं झालंय

346

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे.

सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यात गोंधळ निर्माण झाला आहे. काहीही समजेनासं झालं आहे. विषय अतिशय संवेदनशील आहे. कोणताही आरोप जेव्हा त्या कुटुंबावर होतो, त्या कुटुंबात इतरही लोक असतात. भारतातील कुटुंब म्हणजे कपल नसतं. ती फॅमिली कशातून जाते याचा आपण दोन्ही बाजूंचा सर्वांनी विचार करायला हवा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.