उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलन सकाळी ११ वाजता प्रत्येक जिल्हा आणि शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर जमून घंटानाद करीत निदर्शने करत टपाल मास्टर यांना महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अजय बिष्ट यांच्या नावे लिहिलेली पत्रे त्यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी दिली जाणार आहेत.
उत्तर प्रदेशातील महिलावरील दिवसेंदिवस अत्याचार वाढत असून त्याबाबत युपी सरकार गंभीर नाही. त्यामुळेच त्यांचे योगी आदित्यनाथ हे नाव न वापरता त्यांच्या मूळ नावे त्यांना पत्रे दिली आहेत. योगी हा शब्द फार जबाबदारीचा असून ही जबाबदारी पार पाडण्यास अजय बिष्ट सक्षम नसल्यामुळे त्यांचा तसा उल्लेख या पत्रात टाळला आहे. असं राष्ट्रवादी महिला काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.