पुण्यातील भाजप बंडाळी बद्दल राष्ट्रवादीच्या अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…

206

पुणे महानगरपालिकेच्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे १९ नगरसेवक पक्षांतर करणार असल्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक महाविकास आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

पुणे महापालिकेत भाजपकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून, त्यातील १९ नगरसेवक बंड करणार म्हणून भाजपने आत्तापासून नगरसेवकांवर नजर ठेवली आहे. पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी बंदोबस्त सुरू केला आहे.

गेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपमध्ये अन्य पक्षातील अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला होता. मात्र, आता तेच नगरसेवक पुन्हा अन्य पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. असे झाल्यास भाजपला पुण्यात मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे पुण्याचे १९ नगरसेवक नाराज प्रकरणी मला अधिक माहिती नाही. मी उद्या पुण्याला जातोय. उद्या मिटिंग आहेत. ही ऐकीव माहिती, काही मिळालं नाही की अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. अस अजित पवार म्हणाले आहेत.