राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यासह अमरावती आणि बडनेर मतदारसंघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्व निघालो आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेण्यासाठी, महाविकास आघाडीतील पक्षांशी ताळमेळ घालून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांनी असंख्य तरूण आज प्रभावित झालेले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी आकर्षण निर्माण झालं आहे. या सर्व तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छताखाली आणत राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी आपण काम करायला हवे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. समाजात स्थान असलेल्या लोकांना आपल्याला पक्षात स्थान द्यायचे आहे. हा धोरणात्मक बदल आपण करायला हवा. हा जर झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात एक सक्षम पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दौऱ्यावर आहेत. त्यांनी काही सूचना केल्या आहेत, त्याचे पालन जर आपण केले तर अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अमरावतीत ताकद आहे. आपण जर योग्य निर्णय घेतले, थोडासा प्रयत्न केला तर इथे पक्षाच्या तीन जागा निवडून येऊ शकतात. येत्या काळात त्रुटी दूर करून आपल्याला राष्ट्रवादी परिवार मोठा करायचा आहे, असे प्रतिपादन अनिल देशमुख यांनी यावेळी केले.