राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. लग्नात मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच उल्लंघन केल्याचं प्रथमदर्शनी समोर आले आहे. या शाही विवाह सोहळ्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
या लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अनेक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या लग्न सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय धाब्यावर बसवले गेले होते.
नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पुरती पायमल्ली करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.