राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी एक मागणी केली आहे आहे.तसेच आगामी काळात देखील त्याच पद्धतीने उभा राहणार आहे.अशी ग्वाही तरंगे यांनी दिली.
साहेब तुम्ही दिल्लीला फोन केला, आणि रासायनिक खतांच्या किमती कमी झाल्या. तसाच एक आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांना एक फोन करा आणि आम्हाला हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवून द्या.अशी मागणी त्यांनी केली आहे.
शरद पवार यांनी एक दिल्लीला फोन केला तर खतांच्या किमती कमी केल्या. केंद्रात भाजपचे सरकार आहे. परंतु राज्यात आपल्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या एका कॉलची इंदापूर तालुक्याला नितांत गरज आहे.असेही डॉ.तरंगे म्हणाले आहेत.