संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज: प्रवीण दरेकर

36

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी’ असं प्रविण दरेकर यांचं मत आहे.

संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे, अशीही टीका केली आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच अशा प्रकारचे आरोप करणं चूक आहे. यासाठीच संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी आहे.

दरेकर म्हणाले, ‘संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका करत न्यायालयाने काय करावं असं मार्गदर्शनच ते करु लागले आहेत. न्यायालय कोणत्याही सरकारच्या आदेशावर चालत नसते. कोर्टावर कोणताही आरोप करणे म्हणजे न्यायालयाचा अपमान आहे. त्यामुळं राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे.