NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये NEET-PG परीक्षा 4 महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NEET PG 2021 परीक्षा 18 एप्रिल 2021ला आयोजित केली जाणार होती.
ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी आयोजित केली जाते.
तसेच कोरोना काळात जे वैद्यकीय कर्मचारी 100 दिवसांची सेवा पूर्ण करतील. त्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कोरोना राष्ट्रीय सेवा सम्मानानं गौरवण्यात येईल, असं पीएमओकडून कळवण्यात आलं आहे.