बॉलीवूड गायिका आणि इंडियन आयडलची जज नेहा कक्कर सोशल मिडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. नेहा कक्कर हिने तिच्या चाहत्यांना खूप चांगली बातमी दिली आहे. नेहा कक्कर लवकरच आई होणार आहे. सोशल मिडियावर ती अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता नेहानं तिच्या चाहत्यांना खुशखबरी दिली आहे. नेहा कक्करने पती रोहनप्रीत सिंग याच्याबरोबर इन्स्टाग्रामवर एक अतिशय गोंडस आणि रोमँटिक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोशल मिडियावरून तिने याबाबत माहिती दिली आहे.
फोटोमध्ये नेहा निळ्या रंगाच्या डेनिम डंगरीजमध्ये दिसली. हा फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. नेहाने फोटो शेअर करत “खयाल रखा कर”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर रोहनप्रीतनेदेखील कमेंट केली आहे. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, हे पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र, तिच्या चाहत्यांना नेहा कक्कडच्या गरोदरपणावर विश्वास बसत नाही. अनेक यूजर्सनी कमेंट्सद्वारे नेहाच्या गरोदरपणाबद्दल आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.
सध्या सोशल मीडियावर नेहाचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे नेहा लग्नापूर्वीच गरोदर होती अशी चर्चा रंगली आहे. २४ ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन महिने पूर्ण होत आहेत. या फोटोवरून चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.