नेटकरी भारतीय क्रिकेट टीमच्या पराभवास ‘यांना’ जबाबदार ठरवत आहेत

17

टीम इंडियानं नुकतच पार पडलेल्या कसोटीत खराब कामगिरी केली, त्याचे नेतृत्व विराट कोहली करत होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या चाहत्यांनी अनुष्का शर्माला यासाठी जबाबदार ठरवण्यास सुरुवात केली.एवढंच नाही तर नेटकऱ्यांनी अनुष्कासोबतच तिच्या होणऱ्या बाळालाही ट्रोल केलं आहे.

पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळविल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला केवळ 90 धावांचं लक्ष्य देऊ शकली.अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी बॉल टेस्टमध्ये भारतीय फलंदाजी अवघ्या 36 धावांवर थांबली, जो कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात कमी स्कोर आहे

मीम्सच्या माध्यमातून अनुष्का शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.अनुष्कामुळे कायमच भारतीय संघाचे पराजय होत असल्याचे चित्र नेटकऱ्यांनी उभे केले आहे.अनेकदा याला विराट कोहलीने प्रत्युत्तर दिले आहे.