पेट्रोलच्या दरावरुन प्रतिक्रिया देणार्‍या त्या नेत्याच्या ट्वीटला नेटीझन्सचा प्रतिसाद

9

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत. वाढलेल्या दरामुळे सामान्यांच्या खिशावर ताण येतो आहे. अशांतच २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि यामध्ये पेट्रोल २.५ रु. प्रतिलिटर आणि डिझेल ४ रु प्रतिलिटर असा ऊपकर लावण्याची घोषना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली. अगोदरच पेट्रोलचे वाढलेले भाव आणि त्यावर अर्थसंकल्पात करण्यात आलेली ही घोषणा यावरुन भाजपचेच जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी चांगलेच संतापले. भारत म्हणजेच रामाच्या देशातील पेट्रोलची तुलना थेट सितेचा नेपाळ आणि रावणाच्या लंकेसोबत त्यांनी केली.

सुब्रमण्यम स्वामी यांनी हे तुलनात्मक ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये स्वामी म्हणतात रामाच्या भारतात पेट्रोलची किंमत ९३ रु. आहे. सितेच्या नेपाळमध्ये ५३ रु. आणि रावणाच्या लंकेत ५१ रु. प्रतिलिटर आहे. आपल्या पक्षातील नेत्यांच्याविरोधात हे ट्वीट केले असल्यामुळे राजकीय वर्तूळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर तिकडे नेटीझन्सनी स्वामींच्या या ट्वीटला चांगलच डोक्यावर घेतले आहे.

या ट्वीटचा आधार घेत अनेक माध्यमांनी बातम्यासुद्धा केल्या आहे. या बातम्यासुद्धा ईंटरनेटवर चांगल्याच ट्रेंण्ड होत आहे. दरम्यान सुब्रमण्ययम स्वामींनी आपल्याच पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपच्या नेत्या ऊमा भारती यांनी यावर सावरासावरीचा प्रयत्न केला आहे. सुब्रमण्ययम स्वामी यांनी मात्र यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.