राज्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद आहेत. तसेच आठवी ते बारावीपर्यंतच्या देखील काही शाळा बंद आहेत. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जास्त प्रमाणात होत आहे. सोलापूरमध्ये शालेय शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “स्वाध्याय’ या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता त्यामध्ये उर्दू माध्यमाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत केले जाणार आहे. या योजनेसाठी राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक राहुल द्विवेदी यांच्यासह सर्व शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी व विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक हे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://youtu.be/UNpEvZl7RIw येथे पाहता येणार आहे. यावेळी प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना सांगावे व सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम यू – ट्यूबवर पाहता येणार आहे. तसेच शालेय शिक्षण विभाग यांच्याकडून विद्यार्थ्यांना नववर्ष संदेश देखील देण्यात येणार आहे.