अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन!

18

टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. मंगळवारी 9 फेब्रुवारीला अनिताने एका मुलाला जन्म दिला. अनिताच्या मुलाची पहिली झलक समोर आली आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने याबाबत माहिती दिली आहे. अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी आपल्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याला घेऊन खूप उत्साहित आहेत.

रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो शेअर केला आहे. स्वतःचा आणि अनिताचा फोटो शेअर करताना रोहितने ‘मुलगा झाला’ असं कॅप्शन लिहिले आहे. रोहितने पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी दोघांचंही अभिनंदन केले आहे. अनीता हसनंदानी हिने ऑक्टोबर 2020 मध्ये ती गरोदर असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली होती. ती नेहमी बेबीबम्पसह सोशल मिडियावर फोटो शेअर करत होती.

हॉस्पिटलच्या आतील फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अनिता आणि तिचा पतीच्या चेहर्‍यावरील हास्यानेच कळतंय की ते दोघे किती आनंदी आहेत. याच फोटोंमध्ये मुलाची एक झलकसुद्धा दिसतेय. एल्फा वर्ल्ड हँडलवरून शेअर केलेल्या या फोटोत बाळाची पहिली झलक फोनच्या स्क्रीनवर दिसली आहे.

अनिताने 2013 मध्ये बिझनेसमन रोहित रेड्डीशी लग्न केले होते. अनिताने बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या शो ‘नागीन’ मधील तिच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. अनिताचे फिल्मी करिअर काही खास नव्हते, पण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडण्यात तिला यश आले आहे. अनिता मोहब्बतें, काव्यांजली, क्यो की सास भी कभी बहू थीं, कसम अशा टीव्ही सीरियल्सचा भाग राहिली आहे.