गायक आनंद शिंदेंच्या आवाजात शरद पवारांवरील नवीन गाणं रिलीज

56

मराठी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक आनंद शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर गाणे गायले आहे. या गाण्याचे बोल ‘शरद पवार साहेबांची जीवनकथा’ हे आहे. आनंद शिंदे यांचे पुत्र संगीतकार ‘उत्कर्ष शिंदे’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

हे गाणे रिलीझ होऊन अवघे काही तास झाले आहेत, पण यादरम्यान या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.या गाण्याला ‘विजय आनंद म्युझिक’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे.

तसेच ‘एकनाथ माळी’ यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. देशातील जेष्ठ राजकारणी अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी देशाचे संरक्षण मंत्री, कृषीमंत्री, अन्न पुरवठा मंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रमुखपद सांभाळले आहे.

आनंद शिंदे यांनी मराठी सिने आणि संगीत सृष्टीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.आता यात शरद पवार यांच्यावर गाणे गायलेल्या गाण्याची भर पडली आहे. या गाण्यात आनंद शिंदे यांनी शरद पवार यांच्या जन्मापासून आतापर्यंतची संपुर्ण कहाणी मांडली आहे.