त्या धमकीच्या पत्राचा तपास एनआयएकडे तर मनसुख हिरेनच्या मृत्युचा तपास एटीएसकडेच!

6

रीलायन्स ऊद्योगसमुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानसमोर ज्वलनशील पदार्थ असलेली एक कार निर्जन अवस्थेत आढळली होती. त्यामध्ये एक अंबानी यांच्यासाठी धमकीचे पत्रसुद्धा होते. या प्रकरणामुळे सर्वत्र चिंतेचे वातवरण पसरले होते, तोच अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या त्या गाडीचे मालकाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटनासुद्धा समोर आली आणि त्यानंतर तपास यंत्रणेसह सर्वानाच या घटनेचा धक्का बसला. भाजपने याप्रकरणी सभागृहात आवाज ऊठवत एनआयएलडे तपास सोपवण्याची मागणी केली तर राज्य सरकारने एटीएसकडे तपास सोपवला होता. त्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि अंतिमत: दोन्ही संस्थेकडे तपास सोपवण्यात आला.

यामध्ये मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली ती कार आणि त्यातील धमकीचे पत्र याचा तपास एनआयए करणार आहे. तसेच गाडीमालक मनसुख हीरेन यांच्या संशयित मृत्युचा तपास एटीएस करणार आहे.

मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलीना निवासस्थानासमोर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या अवस्थेतील गाडी पार्क करण्यात आली होती. गाडीचा तपास केला असता, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आठ दिवसांअगोदतव विक्रोळी परिसरातून गाडी चोरी गेल्याची तक्रार नोदंवली होती. दरम्यान घटनेला वेगळं वलण देणारी घटना घडली. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला आणि त्यानंतर तपासयंत्रणांचे धाबेच दणानले.

पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या कुटुबियांनी तो फेटाळून लावला. तसेच या तपासप्रकरणात क्राईम ब्रांचचे अधिकारी तसेच शिवसेनेचे जवळचे मानले जाणारे सचिन वाझे यांचासुद्धा सहभाग होता. त्यामुळे तपास दबावात होतो असा संशय घेत एनअायएकडे तपास सोपवण्याची मागणी भाजपने केली होती. केंद्रिय गृहमंत्रालयामे यासंबंद्धी महत्वाचा निर्णय दिला आहे. हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास एटीएसकडे असणार आहे, तर एनआयए अंबानी यांच्या घरासमोरील त्या स्फोटक पदार्थ आणि धमकीच्या पत्राच्या प्रकरणाचा तपास करणार आहे.