“कोरोना संसर्ग रोखण्यास नाईट कर्फ्यु ऊपयोगाचा नाही” नाईट कर्फ्युवर केंद्रिय आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

4

कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिव वाढतोच आहे. गेल्या चोवीस तासात भारतात ६२,२५८ रुग्ण आढळले आहेत तर २७१ जणांचा मृत्यु झाला आहे. रुग्णवाढीच्या संख्येमध्ये महाराष्ट्राने पुन्हा अव्वल स्थान पाटकावले आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात ३६,९०२ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णवाढीवर चिंता व्यक्त करत संपूर्ण महाराष्ट्रभर रात्री ८ वाजेनंतर जमावबंदी व संचारबंदीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र यावर केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण देत नाईट कर्फ्युचा संसर्ग रोखण्यास ऊपयोग होत नसल्याचे म्हटले आहे.

फेबृवारीच्या अखेरपासून महाराष्ट्रात रुग्णवाढीस सुरिवात झाली होती. त्यावेळीसुद्धा महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरणार्‍या जिल्ह्यात सुरुवातील नाईट कर्फ्युचाच मार्ग अवलंबविण्यात आला होता. आतादेखील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनीसुद्धा नाईट कर्फ्यु लावणार असल्याचे संकते दिले.

परंतू केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नाईट कर्फ्यु संसर्गास कमी करण्यास ऊपयोगाचा नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान लसीकरणावर अधिकाधिक भर देण्यात यावा असेसुद्धा ते यावेळी म्हणाले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर राजकारणसुद्धा तापतांना दिसत आहे. महाराष्ट्रातच रुग्णसंख्या का वाढते आहे अश प्रश्न ऊपस्थित केले जात अाहेत. तर काही दिवसांअगोदर आलेल्या केंद्रिय पथकाने महाराष्ट्रातील संसर्ग निवारण हाताळण्याच्या परिस्थितीवर बोट ठेवले होते. मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या जमावबंदीचा निर्णय घेतलेला आहे. तसेच परिस्थिती आटोक्यात न आल्यास पूर्ण लॉकडाऊन अनिच्छेने करावा लागेल असेसुद्धा मुख्यमंत्री म्हणाले आहेत.