कोरोना ने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र सरकारने अनेन निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यातील अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात येत आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यु हा ऊपाय निरर्थक असल्याचे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्राने त्यासंबंद्धिचे पत्र राज्य सरकारला पाठवले असून नाईट कर्फ्यु कोरोना संस्रग रोखण्यास फारसा परिणामकारक नसल्याचे त्यामध्ये नमुद केले आहे.
देशात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रातसुद्धा फेबृवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होण्यास सुरुवात झाली. परिणामी केंद्राची काही पथके परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात आली होती. या पथकांनी कोरोनाचा पंरसार रोखण्यासंदर्भात काही सुचना केल्या होत्या तसेच केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर केंद्रिय अारोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यात वरील गोष्टी नमुद केल्या आहेत.
केंद्रातून पाठवण्यात आलेल्या पथकांनी संसर्गाला आळा घालण्यासाठी काही महत्वाच्या ऊपाययोजनांवर भर देण्यास सांगीतले होते. यापैकी
संक्रमित घर शोधून कंटेंनमेन्ट झिनवर अधिक भर देण्याचे म्हटले होते. तसेच बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील इतरांचा शोध घेऊन त्यांच्या चाचणीवर भर देण्याचेसुद्धा सुचवले होते. वर्दळीच्या ठिकाणी रॅपीड एंटीजन टेस्टचा वापर करुन बाधीत रुग्णांना वेगळे ठेवण्यावर भर देणे आवश्यक आह. अशा अनेक ऊपाययोजनांचासुद्धा या अहवालात ऊल्लेख आहे.