भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टीकेमध्ये त्यांनी चक्क संजय राऊत यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा देखील करून टाकली आहे.
संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघात गेले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नाला उत्तरे दिली. त्यावेळी राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. असा सल्ला त्यांनी दिला होता. याच मुद्द्याला धरून निलेश राणेंनी टीका केली आहे.
शिवसेनेतल्या एका रंगीला मुळे शिवसेनेची उलटी दौड सुरू झाली… संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’ असं ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.