शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना काल ईडीने नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांना आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतला होता. याविषयी बोलताना, संजय राऊत यांनी, ‘माझ्याशी पंगा घेऊ नका. मी नंगा माणूस आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. याच प्रतिक्रियेवरून माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांची चांगलीच फिरकी घेत ट्विट केले आहे.
हे ट्विट करत निलेश राणे यांनी, “संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. असे लिहले आहे. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या. असे म्हणत निलेश राणेंनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.