‘त्या ‘पोस्टर वरून निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

18

शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालय, भाजपच्या कार्यालयाबाहेर होर्डिंग ठोकल्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी भाजपवर कडाडून टीका केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला काय उखडून घ्यायचे ते घ्या, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान दिले. त्याच बरोबर हे सरकार पाडण्याचा विडा भाजपाच्या नेत्यांनी उचलला असून त्यासाठी सरकारी यत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करत भाजपाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच त्यांनी दिला होता.

शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशा बाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं??ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.