निलेश राणे यांनी ट्विट करून संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अत्यंत शेलक्या भाषेचा वापर केला आहे.
शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकैत यांना अश्रू अनावर झाले. राऊत आणि शिष्टमंडळाने टिकैत यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आश्वासनही आंदोलकांना दिलं.
संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसेच कधी मराठा आंदोलकांना का भेटले नाहीत, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला. महाराष्ट्रातील कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधीच उपस्थित राहिले नाहीत.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा खासदारांनी आज गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते.
त्यांना महाराष्ट्रातील आंदोलनकारी नकोत केवळ महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे, अशी टीकाही निलेश राणे यांनी केली.