“जिथे दिसणार तिथे फटकावणार”, निलेश राणे शिवसेना खासदारावर बरसले

11

नारायण राणे यांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी महराष्ट्र दौर्‍यावर आलेले केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यानंतर राणे कुटुंबीय चांगलेच चर्चेत आले आहे. अमित शहांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमिवर नारायण राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राणे विरुद्ध महाविकासआघाडी असा वाद सुरु झाला होता. यादरम्यान अनेक अारोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. यादरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका करत त्यांचे शिक्षण काढले. वडिलांचे शिक्षण काढल्याचे निलेश राणे यांचा संताप अनावर झाला आणि एक व्हिडिअो ट्वीट करत “जेथे दिसणार तीथे फटकावणार” या भाषेत विनायक राऊतांना सुनावले आहे. परिणामी कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

निलेश राणे आणि नितेश राणे या राणेपुत्रांची अोळख आक्रमक नेते म्हणून आहे. अमित शहा माघारी परतताच नितेश राणे यांच्या मतदारसंघातील सात नगरसेवकांनी एकाचवेळेस राजीनामा देत शिवसेनेचा हात पकडला. यावरुन माझ्यातर्फे शिवसेनेस हे सात नगरसेवक व्हॅलेंटाईनचे गीफ्ट असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यानंतच विनायक राऊत यांनी नारायण राणेंच शिक्षण काढले असता निलेश राणे यांनी विनायक राउतांना कोकणातून कायनचे हाकलून देणार असल्याचे सांगीतले आहे.

“इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. यांस निलेश राणे यांनी ऊत्तर दिले आहे.

“नेहमीप्रमाणे विनायक राऊत भुंकायला बाहेर आले आहेत. सामाजिक कामासाठी विनायक राऊत कधीही बोलणार नाहीत. पण उलटी करायला, घाण करायला नेहमी पुढे असतात. त्यांची स्वत:ची किंमत काय? भाजपाच्या लाटेत दोन वेळा हा माणूस निवडून आला,” असं निलेश राणे यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच “हिम्मत असेल तर त्यांनी राजिनामा द्यावा अाणि पुन्हा निवडणुक लढवावी, ते असे करणार नाहीत. कारण त्यांच्यात हिम्मतच नाहीये. खासदारकीचा एकही गुण त्यांच्यात नाहीये. विनायक राऊत हे मातोश्रीचे चप्पलचोर आहेत. यंदा तुमचा बंदोबस्त लावून तुम्हाला कोकणातून कायमचे हाकलून लावणार आहे.” असेसुद्धा निलेश राणे म्हणाले. सोबतच आपल्या भाषेत बदल केला नाही तर जिथे दिसणार तिथे फटकावणार असा ईशारासुद्धा निलेश राणेंनी यावेळी दिला.

विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार आहे. शिवसेनेतील बाळासाहेबांचे सहकारी म्हणूनसुद्धा त्यांची अोळख आहे. याअगोदरसुद्धा विनायक राऊत यांनी राजकारणातील अनेक पदे भुषविले आहे. कोकणात राऊतांचे समर्थकांची संख्यासुद्धा पुष्कळ आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.