नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल विशेष लेख लिहिला आहे.केंदीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे.
सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करुन त्याला कृतीची पुरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात गडकरींचा अव्वल क्रमांक लागतो अशा शब्दात अजितदादांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
सन्माननीय गडकरीसाहेब आता जरी केंद्रात काम करत असले तरी राज्याच्या विधीमंडळात सहकारी म्हणून अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. त्यातही सत्तेत आणि विरोधी पक्षात अशा दोन्ही भूमिकांतून आम्ही कायमच एकमेकांसमोर उभे होतो.असही त्यांनी म्हटले आहे.
राज्याच्या प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. नवकल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून देशाची सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना अश्या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.