नितीन राऊत यांनीही वीजबिल भरायलाचं हवं :चंद्रशेखर बावनकुळे

0

राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव विजबिलाच्या मुद्द्याने उग्र रूप घेतले आहे .विजबिलमाफीसाठी राज्य सरकारमध्ये कुणी ही अडचण आणण्याचा प्रयत्न करू नये. प्रश्न राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आहे या नितीन राऊतांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही वीजबिल भरुच आणि ते भरायलाच हवे ,नितीन राऊतांनीही भरायला हवे असे म्हणत गरीब जनता हजारो रुपयांची बिल भरणार कुठून हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वाढीव विजबिलाच्या प्रश्नावरून मनसे आणि भाजप राज्यभर आंदोलने करत आहेत यावर नितीन राऊत यांनी विजबिलाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे,देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी त्यांना आलेली विजबिले भरली आहेत पण जनतेला सांगतात बिले भरू नका हा कुठला न्याय आहे असा प्रश्न विचारला आहे.

त्यावर प्रश्न लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांचा नाही राज्यात १०० युनिट्स पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या गरीब जनतेचा आहे हजारो रुपयांची बिले ते भरणार कुठून हा प्रश्न आहे ,असे बावनकुळे यांनी म्हटले आहे