राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँगेसची अवस्था एकीकडे अध्यक्ष मिळेना आणि दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांच्या कुरबुऱ्या थांबत नाहीत अशी झाली आहे . काँग्रेस विरोधात निवडणूक लढवलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. असा आक्षेप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता घेतला आहे. मागील महिन्यात राज्यपाल नियुक्त १२ नावांची शिफारस महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आली होती.
महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेसकडून अनिरुद्ध वनकर यांचे नाव देण्यात आले आहे. अनिरुद्ध वनकर यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवारीवर देखील नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील दलित मतदार काँग्रेसपासुन दूर गेला यासाठी राज्यातील दलित नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती.बैठकीत प्रभारी समोर नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली.
काही मुद्यावरून मंत्रिमंडळात साथ मिळत नसल्याची भावना देखील नितीन राऊत यांनी व्यक्त केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,भीमा कोरेगाव प्रकरण पदोन्नतील आरक्षण या मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा झाली. सुशिल कुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात इत्यादी या बैठकीला उपस्थित होते.