मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A व मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरूवात झाली आहे. कांदिवलीमधील आकुर्ली स्टेशनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नेृत्वाकडून काहीसा भेदभाव केला जात असल्याचं जाणवत असल्याचं बोलून दाखवलं. तसेच, कितीही संकटं आली तरी राज्याचा विकास थांबणार नसल्याचंही ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंची देखील उपस्थिती होती.