मराठा आरक्षण रद्द झाल्याने सातारा शहरात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थाना समाेर शेण्या पेटविल्या, राष्ट्रवादी काॅंग्रेस तसेच काॅंग्रेसच्या कार्यालयांवर सकाळी मराठा समाज कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.
राज्यात मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका या समाजाच्या कायम पाठीशी राहणारीच आहे. मराठा आरक्षणाचे राजकारण केलं जात असल्याची खंत राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे व्यक्त केली .
तसेच काही जण प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहेत, हे दुर्दैव आहे. याचा मी निषेध करतो असे सांगून आम्ही उद्याचा लढ्यात सहभागी असू पण, एकाच पक्षाला काेण टार्गेट करणार असेल तरी आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला.