नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांनी मविआच्या दाव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजप आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र भाजपातून एकही आमदार फुटणार नाही असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले
महाराष्ट्रात देखील येत्या काळात सरकार पाडण्यासाठी राजकीय हालचाली होण्याची शक्यता मविआ आणि भाजप वर्तविण्यात येत आहे. येत्या काळात भाजपातून आमदार फुटणार असा दावा मविआ पक्षाकडून केला जात आहे.