वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पुण्यात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.पुणे शहरात पुर्ण लॉकडाउन ची आवश्यक्ता नसल्याचं मत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं आहे.
सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकच केंद्रीय यंत्रणा किंवा कॉल सेंटर असावे अशी भुमिका त्यांनी मांडली आहे. पुणे जिल्ह्यासाठी एकच बुलेटिन काढले जावे असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येक रुग्णालयाबाहेर दिल्ली प्रमाणे स्क्रीन उभारले जावेत अशी सुचना पथकाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय वॉर रुमची आवश्यक्ता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र सरकार कडून आलेल्या टीम पैकी पहिल्या टीमचा हा अहवाल आहे.डॉ. जुगल किशोर आणि डॉ. घनःश्याम पांडे यांचा या टीम मध्ये समावेश होता. या अहवालाची प्रत लोकमतच्या हाती लागली आहे.