चंदनाचा सुगंध मनाला मोहित करणारा आहे. प्रत्येक देवघरात चंदनाचा ठेवा असतोच. महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ अन्वये चंदनाचे झाड तोडण्यास बंदी होती. राज्य सरकारने ही बंदी आता मागे घेतली आहे. त्यामुळे आता चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणात होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
१ टन चंदन लाकडापासून कमीत कमी ८ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. चंदनाचे प्रामुख्याने रक्तचंदन, लालचंदन आणि श्वेतचंदन असे प्रकार आहेत. आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतील चंदनाचे क्षेत्र वाढीस लागले आहे.
लघू, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी चंदनाचे झाड तोडण्यावर असलेली बंदी उठविण्याची विनंती करणारे पत्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते.
बंदी उठविण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. रामबाबू यांनी म्हटले आहे.