नीता अंबानिंना BHU च्या वतीने व्हिजिटींग प्रोफेसर बनवण्याचा कसलाही प्रस्ताव नाही :रिलायन्सचे स्पष्टीकरण

17

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी बुधवारी म्हटलं की, नीता अंबानी यांना BHU च्या वतीने व्हिजिटींग प्रोफेसर बनवण्याचा कसलाही प्रस्ताव मिळाला नाहीये.असे स्पष्टीकरण त्यांनी दिल आहे .

नीता अंबानी यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून बी.कॉम. केलं आहे आणि त्यांना 2014 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचं कार्यकारी प्रमुख बनवण्यात आलं आहे. असं म्हटलं जात होतं की, त्यांची एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून प्रतिमा असल्याने हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

विद्यार्थ्यांनी असा आरोप केला होता की, BHU ला उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालवलं जात आहे. याबाबत त्यांनी कारवाईची देखील मागणी केली होती.

अलिकडेच अशी बातमी आली होती की, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या सामाजिक विज्ञान विभागाकडून नीता अंबानींना व्हिजिटींग प्रोफेसर बनवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.