परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्य पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदी जारी केलेली असताना पूर्णा तालुक्यातील कानडखेड या गावी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल पूर्णा पोलिसांनी संयोजक सरपंचासह अनेकांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
भव्य कुस्तीच्या फडाचे आयोजन केले. गावातील लोक जमवले यामुळे पूर्णा पोलिसांनी 50 ते 70 इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूर्ण तालुक्यातील कानडखेडा गावातील ही अनाकलनीय घटना असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांनी माहिती देताना सांगितले. तलाठी यांच्या फिर्यादी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगभरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परभणीत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. लस, ऑक्सीजन, रेमडेसिविर इंजेक्शन इत्यादींची कमतरता राज्यात आहे. आणि तरीही मनोरंजन म्हणून कुस्तीचे सामने आयोजीत करणं हे आश्चर्यकारक आहे. सदरील आयोजकांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.