औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारादरम्यान गायकवाड यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. १२ वर्ष अपमान सहन केला. सर्व काही तपासूनच पक्ष सोडला आहे .भाजपमध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया संपुष्टात आली आहे. भाजपमध्ये नियमानुसार कोणतंही काम होत नाही. अशी टीका जयसिंगराव गायकवाड यांनी केली आहे .
मराठवाडा पदवीधर संघात उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे .माझ्यासारख्या राजकीय आखाड्यातील घोड्याला १२ वर्ष खुंटीला बांधून ठेवलं. राष्ट्रवादी सोडल्याचा मला पश्चाताप होतोय. अशी खंत त्यानी व्यक्त केली. आत्ता ‘मी आलोय साहेब ,येणाऱ्यांची मालिका खूप मोठी आहे .ते आत्ता सगळेच बाहेर येणार आहेत .अशा शब्दांत गायकवाड यांनी भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची भविष्यवाणी केली आहे .त्यांनी भाजपवर टीका करत अनेक गौप्यस्फोट केले आहेत .चंद्रकांत पाटील यांनी कधी आंदोलन केले आहे का ?त्यांना पोलीस कास्टडी माहीत आहे का? असे प्रश्न उपस्थित करत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाण साधला आहे.
मान सन्मान नाही ,कामाची कदर नाही ,केलेल्या कामच कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत ,अशा पक्षात कोण राहील? सध्या पक्षात खडसेंनंतर तावडे आणि दानवे यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे .बहुजनांना संपवण्याचा घाटही भाजपने घातला असल्याची टीकाही गायकवाड यांनी केली आहे .भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांची काय अवस्था आहे. हेही तुम्हाला माहीत आहे असे जयसिंगराव गायकवाड म्हणाले .