ठाकरे सरकारच्या एकाही मंत्र्याला मराठा आरक्षणाबाबत अभ्यास नाही : निलेश राणेंचा आरोप

9

मराठा आरक्षणाच्या विषयाबाबत निलेश राणे राज्यात दौरा करत असून त्याअंतर्गत ते सोमवारी जळगावी आले होते.ठाकरे सरकारच्या एकाही मंत्र्याला मराठा आरक्षणाबाबत अभ्यास नाही. असा आरोप भाजपचे माजी आमदार निलेश राणे यांनी केला आहे .

आयोगाने अहवाल तयार करुन राज्यपालांकडे व नंतर तो राष्ट्रपतींकडे सादर करावा लागेल. ही प्रक्रियाच राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे. महिनाभरानंतर राज्य सरकारने हा आयोग स्थापन केला, त्याला इतका उशीर का? असा प्रश्‍न राणेंनी उपस्थित केला.

सरकारला मराठा आरक्षण द्यायची इच्छाच नाही. फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकवलं होतं, सरकारने मराठा आरक्षणासह ओबीसींचे आरक्षणही घालवले, असा आरोप राणेंनी केला.