राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पण धनंजय मुंडे यांनी त्याबाबतचं वृत्त फेटाळून लावलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित राज्यातील विविध मंत्र्यांच्या बंगल्यांवर दुरुस्तीसाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.धनंजय मुंडे यांनी ट्विट करून त्याबाबतचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या ‘चित्रकूट’ या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही,’ असं धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याचं सांगता मग मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी 90 कोटी कसे आले? मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी कुठून आले?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्र्यांच्या बंगल्यावर करण्यात आलेल्या खर्चावरून सरकारवर टीका केली आहे.