…आता रेल्वेद्वारे ऑक्सीजन वाहतुकीला परवानगी द्या, आरोग्यमंत्र्याची केंद्राला गळ

12

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. हर्षवर्धन यांना माहिती दिली.

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, असू मागणी यावेळी राजेश टोपे यांनी केली आहे.

राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, नवीन कोरोना विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने मार्गदर्शन करावे. आदी मागण्या यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे राजेश टोपे यांनी केल्या.