कोरोना संसर्गाचा वेग वाढताच आहे. दुसर्या लाटेने अक्षरश: देशात थैमान घातले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस संसर्ग रोखण्यावरील पर्याय असतांना देशात लसींचा तुटवडा जाणवतो आहे. मात्र आता कोरोनावरील आणखी पाच लसी विकसीत होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
सध्या देशासह संपूर्ण जगात कोव्हीडशील्ड आणि कोव्हॅक्सीन या लसींचा ऊपयोग होतो आहे. मात्र आता यासोबतच आणखी पाच लसी बाजारात येणार आहे. यामध्ये स्पुटनीक व्ही, नोव्हावॅक्स, झायकोव्ह डी, या तीन लसींचे नाव समोर आले असून दोन लसींचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
या पाच लसींपैकी एक लस जॉन्सन एण्ड जॉन्सन कंपनी तयार करणार आहे. भारत बायोटेक कंपनी नाकावाटे देणारी लस निर्माण करणार आहे. या लसींची परिणामकारकता तपासल्यानंतर या लसींना परवानगी देण्यात येणार आहे.
स्पुटनिक लस जुनमध्ये, जॉन्सन एण्ड जॉन्सन व झायडस कॅडीला या कंपनीच्या लसी अॉगस्टमध्ये, नोव्हावॅक्स सप्टेंबरमध्ये, व ईतर लसी अॉक्टोंबरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.