आता निर्बंध तोडल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार

20

महाराष्ट्रात कोरोनाचा वेग कायम आहे. संपूर्ण देशात आढळणार्‍या रुग्णसंख्येच्या ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळतायत. त्यापाठोपाठच मुंबईसुद्धा पुन्हा हॉटस्पॉट ठरते आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध कठोर करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून मुंबई पोलिसांनी यासाठी कंबर कसली आहे.

वीकेंड लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होण्याची जवाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनदरम्यान नियमांचे ऊल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. मुंबईकरांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी अडीच हजार पोलिसबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनसुद्धा मुंबईकर प्रतिसाद देत नसल्याचे परिस्थिती आहे. बाजरपेठा, गर्दीच्या ठिकाणांवरुन मोठ्याप्रमाणात नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आता कठोर भूमिका घेणार आहे.

दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्माचार्‍यांना मुभा असणार आहे. मात्र अनावश्यक बाहेर फीरणार्‍यांवर पोलिसांची नजर असणार आहे. अनावश्यल फिरतांना आढळल्यास त्याचेवर थेट फौजदारी कारवाई केली जणार आहे. शहरातील अंतर्गत भागातसुद्धा पोलिसांची गस्त असणार आहे. याकरिता गस्त पथकांची निर्मितीसुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान अनावश्यक घराच्या बाहेर पडलेले आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.